e-Karkun
ई-कारकून
www.ekarkun.in
Smart School Management System
www.ekarkun.in
Smart School Management System
About
प्रणाली विषयी थोडेफार...........
आपण या प्रणाली विषयी जाणून घेण्यास इच्छुक असालच. यामध्ये आपणास कोणत्याही प्रकारचे वेगळे software download करण्याची आवश्यकता नाही. सर्व सेवा या www.ekarkun.in वरून आपणास वापरता येतात. त्यामध्ये शाळा नोंदणी करण्यासाठी उपलब्ध बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक google form उघडतो. त्यामध्ये आपल्या शाळेची प्राथमिक माहिती भरून आपण आपल्या शाळेची नोंदणी सहजरीत्या करू शकतो. नोंदणी झाल्यानंतर आपणास ज्या सेवेचा वापर करावयाचा आहे त्या सेवेसमोरील बटनावर क्लिक करून आपणास त्यानंतर उघडणारा google form व्यवस्थित भरावयाचा आहे. त्यानंतर आपणास अपेक्षित सेवा आपण शाळा नोंदणी करताना दिलेल्या email वर pdf स्वरुपात प्राप्त होईल. अशाप्रकारे आपण या प्रणालीचा वापर सहजपणे आपला मोबाईल अगर संगणक वापरून करू शकतो.
धन्यवाद.......!!!!
नमस्कार............
www.ekarkun.in या website ची निर्मिती गरजेतून झाली आहे. मी स्वतः एक शिक्षक पदी कार्यरत असताना कार्यालयीन कामकाज करत असताना येणाऱ्या अडचणी व पडणारी गरज यातून एखादी online व्यवस्था असावी असे वाटायचे. त्यासाठी सर्वप्रथम संगणकावर EXCEL BASED files तयार करण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वीही झाला. त्यामध्ये काही मर्यादा येत होत्या. त्यानंतर google form या google tools च्या माध्यमातून आपणास काही करता येईल का याचा विचार सुरु झाला आणि हा प्रयत्न आमच्या शाळेपुरता यशस्वी झाला. परंतु आमच्या शाळेत कार्यान्वित या अनोख्या google tools based online प्रणालीचा वापर महाराष्ट्रातील सर्व शाळांना करता यावा यासाठी खूप प्रयत्न झाल्यानंतर शेवटी www.ekarkun.in या सेवा पोर्टल ची निर्मिती झाली. आपण या service portal वर आपल्या शाळेची नोंदणी करून आपण सर्व सेवांचा वापर करू शकता. आपणास खूप खूप शुभेच्छा.
श्री. दीपक वसंतराव चव्हाण,
प्राथमिक शिक्षक,
जि. प. प्राथ. शाळा, शिरसाड ता- यावल जि- जळगाव